आपल्याच भावकीतील व्यक्तीचा तिन जणांनी केला खून

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यासमोरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात जुन्या भांडणाच्या वादातून तीन युवकांनी एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. वजिराबाद पोलीसांनी अत्यंत त्वरीत कार्यवाही करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल दि.13 मे च्या रात्री 11 वाजेच्यासुमारास वजिराबाद पोलीस ठाण्याच्यासमोरील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात हा खूनाचा घटनाक्रम घडला. या ठिकाणी अनेक जण दारु पिण्यासाठी बसतात, काही गरदुले तेथे वास्तव्य करतात अशा अनेक बातम्या वास्तव न्युज लाईव्हने प्रसारीत केलेल्या आहेत.
काल झालेल्या घटनाक्रमात या मैदानात संदीप गंगाराम मेटकर (35) आणि इतर तीन सुनिल मेटकर दिनेश मेटकर आणि लक्ष्मण पवार हे सर्व दारु पित बसलेल होते आणि त्यातच जुन्या भांडणाचा विषय निघाला आणि त्यानंतर सुनिल मेटकर, दिनेश मेटकर आणि लक्ष्मण पवारने संदीप गंगाराम मेटकरला लोखंडी रॉडने एवढी मारहाण केली की, त्याचा खून झाला. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत. वजिराबाद पोलीसांनी खून करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.

One thought on “आपल्याच भावकीतील व्यक्तीचा तिन जणांनी केला खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *