Oplus_131072

नांदेड(प्रतिनिधी)-नरसी येथील एक सराफा दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे.
योगेश गोविंदराव गंभीरे यांची शिवम ज्वेलर्स नावाची नरसी येथे दुकान आहे. दि.15 जुलैच्या सायंकाळी 7.30 वाजता ते आपली दुकान बंद करून घराकडे गेले असतांना 16 जुलैच्या सकाळी 10 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या दुकानाचे शटर वाकवलेले होते आणि त्याला कटरने कापलेले होते. आत प्रवेश करून चोरट्यांनी कॉऊंटरचे ग्लास फोडले आणि तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. रामतिर्थ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!