ऑनलाईन फसवणूक प्रकारात 23 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले असतांना सुध्दा, त्या संदर्भाने पोलीस विभाग आणि प्रसारमाध्यमे जनजागृती करत असतांना सुध्दा लोक त्यात अडकतच आहेत. असा एक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला असून 23 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
प्रशांत सुरेश लिंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.4 एप्रिलच्या रात्री 10 ते 5 एप्रिलच्या दुपारी 2 वाजेदरम्यान हा फसवणूकीचा प्रकार घडला. लिंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रेडींग प्लॅटफॉम बदल शिक्षक या नावाखाली त्यांनी वेगवेगळ्या व्हाटसऍपवर रजिस्ट्रेशन केले आणि त्या गुंतागुंतीच्या प्रकरणानंतर तुमच्याकडे 23 लाख 5 हजार रुपये शिल्लक आहेत ते पाठवून द्या म्हणून वारंवार संदेश दिले. भाग्यनगर पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) नुसार गुन्हा क्रमांक 195/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक रमेश वाघ हे करीत आहेत. काही दिवसांपुर्वीच अशाच लाखो रुपये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *