Oplus_131072

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद जवळील थोटवाडी ता.मुखेड या गावातील घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 49 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
थोटवाडी येथील शिवाजी शंकरराव पाटील यांच्या घराच्या पाठीमागचा दरवाजा कोणी तरी अज्ञात चोरट्याने 13 जुलैच्या दुपारी 12.30 वाजता फोडला. त्यानंतर 14 जुलै रोजी सकाळी 6 वाजता ही घटना समोर आली. तपासणी केली असता त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले 39 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 2 लाख 49 हजार 600 रुपयांचे कोणी तरी चोरून नेले आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 331(4), 305(अ) नुसार गुन्हा क्रमांक 150/2024 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!