इतवारा पोलिसांनी एका युवकाकडून गावठी पिस्तूल एक जिवंत काडतूस पकडले

 

नांदेड,(प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शोध पथकाने मध्यरात्री 12 वाजता एका युवकाला पकडून त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस आणि त्याच्या घरातून तीन तलवारी आणि एक खंजीर असा घातक हत्यारांचा साठा जप्त केला आहे.

नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि त्यांचे सहकारी रात्री गस्त करत असताना 12 वाजेच्या सुमारास इस्लामपुरा भागात हे शेख इस्माईल शेख संदलजी हा आपल्या सोबत बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर इतवारा गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्या तपासणीत त्याच्याकडे 1 गावठी पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस सापडते. सोबतच त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 3 तलवारी आणि 1 खंजीर असा घातक शस्त्र साठा सापडला आहे. शेख इस्माईल शेख संदलजी विरुद्ध पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा क्रमांक 124/2024 दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, इतवारा विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक यांनी इतवारा पोलिसांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *