नांदेड- “नीट परीक्षा 2024” ही रविवार 5 मे 2024 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5.20 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रावर 22 हजार 279 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 5 मे 2024 रोजी 12 वाजेपासून ते सांयकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 950 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आईला मारहाण करतो म्हणून मुलानेच बापाचा खून केला नांदेड शहरातील काही भागात चार दिवसांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार