नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईला मारहाण करतो म्हणून त्याचा राग लक्षात ठेवून एका मुलानेच आपल्या वडीलांचा खून केल्याचा प्रकार मौजे चिकाळा ता.हदगाव येथे घडला आहे. दिलीप मारोतराव तुपेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 एप्रिलच्या रात्री 9.30 वाजेच्यासुमारास चिकाळा येथील त्यांचे बंधू मधुकर मारोतराव तुपेकर (48) यांना त्यांचा मुलगा दत्ता मधुकर तुपेकर(24) याने दगडाने मधुकर तुपेकरचे डोके फोडले आणि शरिरावर अनेक ठिकाणी दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला आहे. तामसा पोलीसांनी याप्रकरणी दत्ता मधुकर तुपेकर विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 38/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.आर.तुगावे हे करीत आहेत. मधुकर आपल्या पत्नीला नेहमी मारहाण करत होतो अशी माहिती सांगण्यात आली आणि त्या रागातून त्यांचा मुलगा दत्ता मधुकर तुपेकरने त्यांचा खून केलाचा हा प्रकार घडला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,727 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जबाबदारी पार पाडण्यात कसुरी केलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश