नांदेड(प्रतिनिधी)- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशयातील तांत्रिक बिघाडामुळे शहरातील काही भागात चार दिवसांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. यामुळे या भागातील जनतेने पाणी जपून वापरावे असे आवाहनही करण्यात आले. नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र या ठिकाणच्या विद्युत मोटारीमध्ये काही तांत्रीक बिघाड झाल्या कारणाने या दुरूस्तीसाठी किमान चार दिवस लागणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. यामुळे नांदेड शहरातील झोन क्रमांक 1 तरोडा(बु) तरोडा (खु), सांगवी झोन क्रमांक 2 अशोकनगर, शिवाजीनगर, वजिराबाद तसेच देगलूर नाका भागातील 2 मे पासून पुढील नियोजित पाणी पुरवठा तीन ते चार दिवस उशीराने होणार आहे. विष्णुपूरी प्रकल्पातील कोटतिर्थ पंप हाऊस येथील 1 मे च्या मध्यरात्री विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. या दुरूस्तीसाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रगती पथावर कार्य सुरू केले असून किमान चार दिवस पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी लागू शकतात. तर नांदेडमधील काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होवू शकणार नाही. नागरीकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,812 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान; १० हजारावर कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार