हेलीकॉप्टरने अमरनाथ यात्रेचे स्वप्न फसवणूकीने भंग झाले

नांदेड(प्रतिनिधी)-हेलीकॉप्टरची ऑनलाईन बुकींग करून अमरनाथ यात्रेला जाण्याचे एका भक्ताचे स्वप्न फसवणूकीमुळे हवेत उडाले.
काशीनाथ शिवलाल सोनवणे रा.लक्ष्मीनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.22 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान त्यांनी अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी बुकींग हेलीधाम डॉट इन या संकेतस्थळावर बुकींग केली. हेलीकॉप्टरची बुकींग करण्यासाठी 89 हजार 900 रुपये घेवून तिकिट बुकींग न करता फसवणुक झाली. ही सर्व फसवणूक आत्माराम देसाई नावाच्या व्यक्तीने 7750882742 या मोबाईल क्रमांकावरून केली. अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या आदेशाने हा गुन्हा विमानतळ पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 66(ड) तंत्रज्ञान कायदा नुसार गुन्हा क्रमांक 134/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *