टपाली मतदान करताना उमेदवारांनी प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन

*गृह मतदानाच्या प्रक्रियेला लक्षात घेण्याचे आवाहन* 

नांदेड- लोकसभा निवडणूक काळातील जे कर्मचारी टपाली मतदान करणार आहे. त्यांच्यासाठी ही सुविधा दुसऱ्या व तिसऱ्या प्रशिक्षण स्थळी उपलब्ध होणार आहे.

नमुना क्रमांक बारा भरून टपाली मतदान करण्याच्या या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांनी आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

 

लोकसभा निवडणूक काळात मोठ्या संख्येने कर्मचारी कर्तव्यावर असताना मतदानाच्या दिवशी मतदान करू शकत नाही. त्यांच्यासाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. फॉर्म क्रमांक 12 भरून टपाली मतदान करता येते. ही सुविधा दुसऱ्या व तिसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी ज्या विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्या प्रशिक्षण स्थळाच्या ठिकाणी दोन मतदार सुलभता केंद्र उपलब्ध करण्यात येत आहे.

 

ही सुविधा 16 नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदारांसाठी व 16 नांदेड लोकसभा मतदार संघासोबत मतदान होणाऱ्या बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,वाशिम,हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघातील मतदार कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला आपला एक प्रतिनिधी नियुक्त करता येणार आहे. याबाबतची नेमणूक उमेदवारांनी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

तसेच नांदेड लोकसभा अंतर्गत जे मतदार 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. दीव्यांग आहेत.ज्यांनी नमुना नंबर 12 डी मध्ये अर्ज भरून दिलेले आहेत. अशा मतदारांना गृह मतदानाची सुविधा १८ ते २१ एप्रिल या काळात निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मतदान पथक अशा मतदारांकडून पुढील चार दिवसात ( १८ते २१ एप्रिल ) मतदान करून घेणार आहे. यावेळी देखील एक प्रतिनिधी नियुक्त करता येईल. या संदर्भातील कल्पना मतदान करणाऱ्या मतदारांना तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना देण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *