श्रीराम नवमी निमित्त विहिंप व बजरंग दलातर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)-विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गा वाहिनी नांदेड तर्फे नांदेड शहरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य अशी मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही भव्य मोटर सायकल रॅली दि.17 एप्रिल बुधवार रोजी सकाळी 8:30 वाजता पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक येथे सामूहिक हनुमान चालीसा व आरती करून निघणार व हनुमान पेठ-मुथा चौक -छ. शिवाजी महाराज स्मारक -चिखलवाडी -अण्णाभाऊ साठे चौक -वसंतराव नाईक चौक -भाग्यनगर -राज कॉर्नर -मालेगाव रोड श्री गजानन महाराज मंदिर ह्या मार्गाने जाणार आहे.

 

मागील दोन वर्षात विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गा वाहिनी यांच्या तर्फे आयोजित भव्य मोटर सायकल (महागर्जना रॅली )रॅलीस उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.सन 2022 मध्ये 2000 मोटर सायकल तर त्याचे रूपांतर 2023 मध्ये 6000 मोटर सायकल अशे भव्य दिव्य स्वरूप हिन्दू एकत्रिकरना मध्ये या मोटर सायकल रॅलीस आलेले आहे.या वरूनच लक्षात येते कि रामभक्ता मध्ये या मोटर सायकल रॅली चे एक आकर्षण निर्माण झालेले आहे.ह्या रॅली मध्ये मातृशक्ती व दुर्गा यांचा सुद्धा विशेष करून जास्तीत जास्त संख्येने सहभाग असतो. भगव्या वादळा मध्ये सर्व रामभक्त राम नामाच्या गजरात हिंदुत्वाच्या जल्लोषात ह्या रॅली मध्ये मग्न होऊन हिंदुत्व एकत्रिकरणात आपला सहभाग नोंदवत असतात

 

याही वर्षी सर्व रामभक्त, मातृशक्ती, दुर्गा ह्या भव्य महागर्जना रॅलीची आतुरतेने वाट पाहत आहे. विशेष मनजे यावेळेस ह्या महागर्जना रॅली मध्ये प्रभू श्रीरामलला ची आकर्षक अशी मूर्ती राहणार आहे तसेच संतांचा सहभाग सुद्धा राहणार आहे आणि सर्व रॅली चा ड्रेस कोड भगवा कुर्ता, मातृशक्ती साठी भगव्या कलरची साडी असा ठेवण्यात आलेला आहे. तरीही जास्तीत जास्त संख्येने रामभक्त, महिला, युवक युवतींनी ह्या रॅली मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व दुर्गा वाहिनी तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *