आयआयटी बॉम्बेतर्फे आयोजित कार्यशाळेस कॉ. गणेश शिंगे यांना निमंत्रण ;स्वच्छता कामगारांना देण्यात येणारे वेतन, वागणूक व इतर प्रश्नांवर चर्चा होणार,!!!

 

नांदेड(प्रतिनिधी)-टूवड्‌र्स ब्राऊन गोल्ड प्रल्कपाअंतर्गत पॉलिसी वर्कशॉप, भारतातील नॉन-नेटवर्क्ड सॅनिटेशनमधील आव्हाने, या विषयी दि. 18 मार्च 2024 रोजी दुसरा मजला व्ही.एम.सी.सी इमारत, आयआयटी बॉम्बे, मुंबई येथे सकाळी 10 ते 4.30 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नांदेड वाघाळा शहर महनगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी तथा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक व अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियमंत्रीत करण्यात आले आहे.

स्वच्छा कामगारांच्या समस्या आणि त्यांच्या ऐकून रहिनिमान व जीवनावर प्रश्नांवर प्रकाश टाकणे ही या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे, स्वच्छता कामगार स्वच्छतेच्या एकूण कामावर महत्वाची भूमिका बजावतात परंतु हे काम करत असताना त्यांना योग्य मोबदला आणि वागणूक मिळत नाही. सदरील कार्यशाळेत महाराष्ट्रातील नांदेड आणि केरळमधील अलेप्पी, शहरातील अभ्यास आणि अनुभवांच्या आधारावर स्वच्छतेच्या कामगारांना सर्वसमावेशक सोयी आणि वंचितता तसेच स्वच्छता कामगारांच्या एकूण प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक व अध्यक्ष या नात्याने केलेल्या कार्याचा अनुभव आणि स्वच्छतेचे काम करणार्‌या कामगारांना येणार्‌या अडीअडचणी आणि त्यांना मिळत असलेले वेतन यासह स्वच्छता कामागारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. आयआयटी बॉम्बेचे एन. सी. नारायन आणि सोपेकॉमचे सचिव सीमा कुलकर्णी यांच्या सहीचे निमंत्रण पत्र कॉ. गणेश शिंगे यांना प्राप्त झाले आहे. सदर कार्यशाळेमध्ये केरळ व नांदेड सह महाराष्ट्रातील आयआयटीचे विद्यार्थी यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात अले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *