समाजकल्याणकडून देण्यात येणार्‍या पुरस्काराचे वितरण

नांदेड(प्रतिनिधी)-सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारचे वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाहू फुले आंबेडकर पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार जमशेद भाभा नाट्यगृह एनसीपीए मार्ग नरीमन पॉईंट मुंबई येथे वितरण करण्यात आले. कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ या संस्थेचा शाहू फुले आंबेडकर पारितोषिक प्रदान करण्यात आला व संस्थेचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, समाजकल्याण मुख्यसचिव सुमंत भांगे याच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार स्विकारतांना संस्थेचे अध्यक्ष कैलास गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, संस्थेच पदाधिकारी निलेश तादलापूरकर. विष्णु कांबळे, शिवाजी नुरंदे, उमेश पाटील, सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी पेंढाकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *