लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीसह 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर नवऱ्याला पोलीस कोठडी भेटल्यानंतर लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 14 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

7 मार्च रोजी धाराशिव येथील डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे या नांदेड येथील अर्पण रक्तपेढी तपासणीसाठी आल्या होत्या. रक्तपेढीतील त्रुटी न काढण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. त्यातील 10 हजार रुपये अर्पण रक्तपेढीने 7 मार्च रोजीचे दिले. दुसऱ्या दिवशी जागतिक महिला दिनी उर्वरीत 1 लाख रुपये लाच घेण्यासाठी अश्र्विनी गोरे यांचा नवरा डॉ.प्रितम तुकाराम राऊत याने अर्पण रक्तपेढीवाल्यांना पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे बोलवले. अर्पण रक्तपेढीवाल्यांनी पंचासमक्ष याच माणसाला पैसे द्यायचे काय? अशी विचारणा डॉ.अश्र्विनी गोरे यांना केली. 5 मार्च रोजी सायंकाळी डॉ.अश्र्विनी किशनराव गोरेला अटक झाली.

आज पोलीस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड,राजेश राठोड, प्रकाश मामुलवार, उल्का जाधव आदींनी डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे (41) यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे याचे सादरीकरण केले. पोलीस कोठडी न मिळावी म्हणून डॉ.अश्र्विनी गोरे यांच्यावतीने ऍड.संदीप पवार यांनी सादरीकरण केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी डॉ.अश्र्विनी गोरेला 14 मार्च 2024 अर्थात चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

संबंधीत बातमी…

50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर पाच दिवस पोलीस कोठडीत; लाच मागणारी महिला डॉक्टर अटकेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *