नांदेड(प्रतिनिधी)-धनंजय सोळंके यांची भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागात मराठवाडा पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या नेमणूकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारत सरकारच्यावतीने अग्रणी, आधुनिक आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशातील उद्योजकांना जास्तीत जास्त मदत मिळावी या हेतूने हे मंत्रालय स्थापन करण्यात आल. सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई)चे चेअरमन सीबु राजन यांनी जारी केलेल्या नियुक्ती पत्रात नांदेड येथील पत्रकार धनंजय प्रल्हाद सोळंके यांची मराठवाडा पश्चिम विभागात उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल बोलतांना धनंजय सोळंके म्हणाले की, देशातील छोटे-छोटे उद्योग करणाऱ्या व्यक्तीगत लोकांना मदत मिळावी या हेतूने मी काम करणार आहे. सोबतच सामाजिक क्षेत्रात केंद्र सरकारने दिलेली ही योजना सर्व सामान्य माणसापर्यंत कशी पोहचेल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत असून वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा त्यांना मिळालेल्या नियुक्तीसाठी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील कामासाठी शुभकामना देत आहे.