नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील सेवानिवृत्त जिल्हाधिकारी ह.रा.कुलकर्णी यांचे दि.20 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास निधन झाले. त्यांच्यावर 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धनघाट येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ह.रा.कुलकर्णी हे जुन्या पिडीतील एक ख्यातनाम आयएएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेत, नांदेड नगरपालिका या ठिकाणी प्रशासक म्हणूक काम केले. विशेषता: नांदेड शहरातील वजिराबाद चौकाचे विस्तारीकरण आणि महम्मदअली रोडचे भुसंपादन हे त्यांच्या काळातील आठवणीतील कामे आहेत. याचबरोबर त्यांनी औरंगाबाद येथे अतिरिक्त आयुक्त, आकोला, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. याचबरोबर अमरावती विभागात उपआयुक्त म्हणूनही काम केले. प्रशासकीय सेवेत काम करत असतांना लोकसंग्रह हे पुस्तकही त्यांनी तयार केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, बहिण, नातवंड असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,192 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरलेल्या पंचविसाव्या आरोग्य शिबिरास २८ मार्च पासून प्रारंभ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.अभयकुमार दांडगे