वाळकी‌ येथे‌ उद्यापासून जाळीचे‌ बाबा‌ यात्रा महोत्सवास‌  प्रारंभ

 

नांदेड (प्रतिनिधि)- वाळकी‌ खुर्द ‌ ता‌.लोहा‌ येथील महानुभाव पंथीयांचे‌‌ श्रध्दास्थान असलेल्या ‌ जाळीचे‌ बाबा‌ यात्रा‌ महोत्सवास‌ दि‌.२९ फेब्रुवारी गुरुवार पासून ‌ प्रारंभ ‌ होत‌ असून‌ या‌ दिवशी ‌ सकाळी‌ महास्थांनास‌ विडा‌ अवसर‌ मंगलस्नान ‌ उपहार‌ व‌ महाआरती ‌ रात्री‌ गावच्या ‌ मुख्य ‌ रस्त्याने‌ ढोलताशांच्या ‌ गजरात‌ पालखी‌ मिरवणूक ‌ व‌ ठिकठिकाणी ‌ बाबांच्या ‌ महाविशेषांचे‌ दर्शन ‌ भाविक भक्त‌ व‌ माहेरवासिंनीसाठी‌ खूले‌ राहणार‌ आहे ‌ , वाळकी‌ खुर्द ‌ ता‌.लोहा‌ शिवारातील ‌ जाळीचे‌ बाबांच्या ‌ यात्रा‌ महोत्सवास‌ दि‌.२९  फेब्रुवारी गुरुवार पासून ‌ प्रारंभ ‌ झाला‌ असून‌ या‌ दिवशी ‌ सकाळी ‌ येथील ‌ मंदिरातील ‌ महाविशेषांना‌ विडा‌ अवसर‌ मंगलस्नान ‌ उपहार‌ व‌ महाआरती ‌ रात्री‌ ‌ ढोलताशांच्या ‌ गजरात‌ ‌ वाजत‌ गाजत‌ मुख्य ‌ रस्त्याने ‌ विशेषांची‌ पालखीतून मिरवणूक ‌ निघणार आहे ‌ व‌ भाविक भक्तांसाठी‌ ठिकठिकाणी ‌ बाबांच्या ‌ दर्शन ‌ सोहळ्यांचे‌ आयोजन‌ करण्यात आले आहे,व‌ रात्री‌ महिला ‌ भजनी‌ मंडळ‌ संचलित सिध्देश्वर संगित‌ संच‌ आलेगाव व‌ शिवशक्ती ‌ भजनी‌ मंडळ‌ मरळक‌ ‌ यांच्या ‌ भजनांचा‌ सामना‌ रंगणार ‌ आहे,तर‌ दि‌.१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पारंपारिक दहीहंडी उत्सव व‌ दु‌.३ वाजता जंगी कुस्त्यांचा फड‌ रंगणार‌ आहे. रात्री ८ वाजता सानिया नांदेडकर यांचा आर्केस्ट्रा विशेष म्हणजे ‌ यात्रा महोत्सव पारंपारिक असं पंचक्रोशीतील भाविक भक्त माहेरवासिंनी‌ या यात्रेसाठी व जाळीचे बाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात, हि‌ यात्रा‌ सलग तीन दिवस चालते महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेली‌ हि‌ यात्रा भाविक भक्तांसाठी जणू पर्वणी‌ असून‌ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महानुभाव पंथीय ‌ साधू तपस्विनी भिक्षुक वासनिक व अनुयायासह भावी भक्तांनी कुस्तीगीर कुस्तीप्रेमी आगाशी पाळणे वाले मिठाई दुकानदार व्यापाऱ्यांनी या यात्रेसाठी आवर्जून यावे असे आवाहन जाळीचे बाबा मंदिराचे मठाधीश व यात्रा कमिटी वाळकी खुर्द ता. लोहा यांच्या वतीने करण्यातआलआहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *