नरेंद्र मोदीजी का हवे आपल्याला 400 पार; भिती वाटते आहे काय?

देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकींचे बिगुल वाजत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टिमने देशभरात अनेक ठिकाणी इतर पक्षातील अनेक लोकांना आपल्या पक्षात ओढून घेण्याचा एक नवीन खेळ सुरू केला आहे. मागच्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या 350 पेक्षा जास्त जागा होत्या. तेंव्हा येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भिती वाटण्याचे काही एक कारण नाही. परंतू भारतीय जनता पार्टी ज्या पध्दतीने इतर पक्षातील लोकांना आपल्याकडे ओढून घेत आहे. त्यामुळे मात्र भारतीय जनता पार्टीच्या मनात कोठे तरी आपल्या जागा 350 पेक्षा कमी होतील याची भिती झळकते आहे. दुसऱ्या महायुध्दातील मुसोलिनी, हिटलर आणि सध्याच्या जगातील रशियाचे राष्ट्रअध्यक्ष पुतीन यांच्या विचारसरणीवर भारतीय जनता पार्टीने चालवलेले काम कोठे तरी दुखत आहे. कारण भारतीय जनता पार्टी ही एक शिस्तबध्द राजकीय पक्ष मानल्या गेलेला राजकीय पक्ष आहे. पण आज शिस्त संपलेली दिसते आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात चांगली कामे केली नाहीत असे नाही, परंतू मुसोलिनी, हिटलर आणि पुतीन यांच्या प्रमाणे चालवलेले काम भारतीय नागरीकांसाठी नक्कीच धोकदायक आहे.मुसोलिनी, हिटलर आणि पुतीन यांनी आपल्या विरोधातली माणसे समाप्त करून आपले राजकारण चालवले. भारतीय जनता पार्टीने मात्र इतर राजकीय लोकांच्या मनात भिती तयार करून आपले राजकारण चालवले आहे. येथेच कुठे तरी पुढे भविष्यात भारतात काय परिस्थिती तयार होईल हे आज सांगणे अशक्य आहे.
आजच उत्तर प्रदेशातील राज्य सभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. ज्यामध्ये समाजवादीचे अनेक आमदार भाजपने फोडले आणि तेथे आपला एक खासदार जास्तीचा निवडुण आणण्याची तयारी सुरू आहे. मागील 25 वर्ष समाजवादी पक्षाच्यावतीने खासदार राहिलेल्या शफिकुल रहेमान यांचे निधन झाले. त्यामुळे समाजवादी पक्षाला सुध्दा निवडणुकीच्या कामात आता अनेक अडचणी येत असतील. राज्यसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील एक अतिरिक्त जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल परंतू त्या एका जागेतून भारताचे भविष्य ठरवता येईल काय? असो या सोबत भारतीय जनता पार्टीने आसाममध्ये हेमंत बिसवा (शर्मा) यांना आपल्या पक्षात आणून त्यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी कालच आसामच्या लोकसभेत एक व्यक्तव्य जारी केले. ज्यामुळे ते म्हणाले की, मी जिवंत असे पर्यंत ओडीसामध्ये बाल विवाह होवू देणार नाही. खऱ्या अर्थाने त्यांना हे वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्याची गरजच नव्हती. कारण बाल विवाह प्रतिबंधक कायदा जवळपास 2006 पासून भारतात अस्तित्वात आहे. मग हेमंत बिसवा यांना नव्याने मी बाल विवाह होवू देणार नाही असे म्हणण्याची काही गरज नव्हती. फक्त 2006 च्या कायद्याला आसाममध्ये प्रत्यक्षात आणण्याची गरज होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे आज भारतभर विविध मत प्रदर्शन सुरू झाले आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी कालच त्यांच्या विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजुर केले. भारतीय जनता पार्टीच्या जाहीर नाम्यात सुध्दा एक देश एक कायदा हा मुद्दा अस्तित्वात आहे. तेंव्हा धामी यांनी आजच समान नागरीक कायदा फक्त झारखंडसाठी जाहीर करून काय मिळवले. त्यापेक्षा नव्या लोकसभेत हा कायदा मंजुर झाला असता तर तो देशभराला एकदाच लागू झाला असता. एक देश एक कायदा या शब्दांना कोणीच विरोध करू शकणार नाही. पण भारतीय संविधानाने आपल्या धर्माच्या आचरणांप्रमाणे स्वतंत्रपणे जगण्याची संधी भारताच्या प्रत्येक नागरीकाला दिलेली आहे. तेंव्हा अगोदर ते स्वातंत्र्य भारत सरकारला बाधीत करावे लागेल. तरच समान नागरीक कायदा अस्तित्वात येवू शकेल. म्हणतात ना प्रेमात आणि युध्दा सर्व काही माफ असत. पण सध्या येणाऱ्या युध्द हे युध्द नसून मतपेटीतल्या मतदानाला आपल्या पाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात आणण्याचे हे सुध्द आहे. तेंव्हा समाजा समाजात लावू देण्यापेक्षा भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून त्याप्रमाणे कायद्यात बदल व्हायला हवे. संविधानातील दिलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करूनच भारतीय जनता पार्टीने जम्मू काश्मिरमधील 370 कलम रद्द केले. याचे सर्व भारत कौतुकच करत आहे. त्यासाठी झालेला अभ्यास, जपलेली विधाने, गाळलेली विधाने आपल्या सरकारने शोधून काढली आणि 370 कलम रद्द करतांना कोणतीही समस्या येणार नाही याची योग्य आखणी करून आपण ते कलम रद्द केले. याचे कौतुकच व्हायला हवे.
भारतीय सैन्यांवर झालेल्या हल्यांचे प्रतिउत्तर देतांना भारत सरकारने काही स्टिंग ऑपरेशन केले. त्यात आलेले यश आज भारतासाठीच नव्हे तर जगासाठी कौतुकाचा विषय आहे. भारताचा एक सैनिक चुकीने चंबळ नदीच्या खोऱ्यातनू वाहत पाकिस्तानमध्ये गेला होता. या संदर्भाने जगभरात झालेल्या विविध चर्चा आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भुमिका यामुळे चुकीने पाकिस्तानमध्ये गेलेला सैनिक जगातील महागड्या रोल्सरॉयल या गाडीत बसून वाघा बॉर्डरवर आणून पाकिस्तानने सोडला होता. ही तुमची भिती भारतीयांना आनंद देणारी आहे. भारताचा मुळप्रतिस्पर्धी पाकिस्तानमध्ये सुध्दा भारताचे प्रधानमंत्री आणि भारताच्या प्रगतीची प्रशंसा पाकिस्तानचे नागरीक करत आहेत. यापेक्षा मोठे सुदैव आपल्या देशाला काय हवे? विज्ञानात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेली प्रगती, रेल्वे विभागात आणलेल्या अनेक नाविण्यपुर्ण योजना, धुक्याच्या परिस्थितीत सुध्दा आता रेल्वे सर्वसामान्यपणे धावत राहिल ही तयार केलेली परिस्थिती नक्कीच प्रशंसा करण्यासारखी आहे. औद्योगिक क्षेत्रांमध्ये तुम्ही केलेला विकास, शेतकऱ्यांना दिलेल्या मदती या सुध्दा दहा पुर्वीच्या भारतातील पेक्षा भरपूर जास्त आहेत. आज शंभु बॉर्डरवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन का झाले? याबद्दल आमच्या माहितीप्रमाणे कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन टुडो यांनी पंजाबमध्ये तयार केलेले अनेक गोदाम आणि त्यात साठवलेला कॅनडाचा गहू आहे हे तुम्ही ओळखले आणि त्यातूनच तुम्ही केलेल्या उपाय योजनांमुळे ज्या लोकांचे गोदाम आहेत त्यांच्या वर्चस्वाचा भाग संपत आल्यामुळे त्यांनी हे बनावट शेतकरी आंदोलन तयार केलेले आहे. ते बनावट आंदोलनातील शेतकरी किती खोटारडे आहेत हे दाखविण्यासाठी तुमच्याकडे अनेक टी.व्ही.चॅनल आहेत. ज्यांचे काम फक्त नरेंद्र मोदी किती छान आहेत हे दाखविणे आहे असो हे आपण करत असताल तर त्यात काही चुक आहे असे म्हणता येणार नाही.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची सुरूवात झाल्याबरोबर आपण आपकी बार 400 पार असा नारा देवून लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे 400 पेक्षा जास्त खासदार असतील असे लक्ष ठेवून जनतेला संबोधन करत आहात. आपल्या जाहीरनाम्यातील राम मंदिर तयार झाले, 370 कलम रद्द झाले, ज्ञानव्यापी मस्जिदमध्ये पुजा सुरू झाली. असा कोणताच मुद्दा आता शिल्लक राहिला नाही. ज्या आधारावर आपण जनतेसमोर मला हे करायचे आहे असे आपल्याला सांगता येणार नाही. जे काही मुद्दे आजही अर्धवट आहेत ते यदा-कदा आपली सरकार नसेल तरी ते पुढे जाणारच आहेत. कारण नवीन सरकार त्या मुद्यांना थांबवू शकत नाही आणि जनता त्या मुद्यांना थांबू देणार नाही. मग आपकी बार 400 पार का हवे. मागील लोकसभेमध्ये आपल्या 350 पेक्षा जास्त जागा होत्या. म्हणजे तुम्ही चांगले काम केले असेल तर त्या जागा आपो-आपच वाढतील. मग तुम्हाला 400 पार मागण्याची गरज काय आणि ही गरज पुर्ण करण्यासाठी आपण महाराष्ट्रात अशोक चव्हाण,मिलिंद देवरा यांच्यासह उत्तर प्रदेशातील बसपाचे चार खासदार आपल्या पक्षात आण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात बसपाचा निर्णय अजून झालेला नाही. पण कधी हा विचार केला का की बाहेरच्या लोकांना आणून आपण त्वरीत प्रभावाने मोठ्या पदावर बसवत आहात तेंव्हा भारतीय जनता पक्षाच्या मुळ कार्यकर्त्यांची जी वाताहत होणार आहे त्याला जबाबदार कोण? बसपाचे चार खासदार आपल्याकडे आले तरी ते काशीराम आणि मायावती यांच्या तालमीत वाढलेले आहेत. ते सुखा-सुखी योगी आदित्यनाथ यांना आपला कारभार चालवू देतील काय? योगी आदित्यनाथ सुध्दा सक्षम नाहीत असे आमचे म्हणणे नाही परंतू एका घरात दहा वेगवेगळी मंडळी असतात त्या दहा जणांना एकत्र करून कुटूंब चालविणे किती अवघड आहे. नरेंद्र मोदीजी आपल्याला तर 130 कोटीचा देश चालवायचा आहे.
भारतीय जनता पक्ष ज्या पध्दतीची भिती इतर राजकीय पक्षांच्या मनात तयार करून आपला कारभार चालविण्याच्या मार्गावर आहे यासाठी आम्ही एकच सांगू इच्छीतो दुरडीने कोंबडा झाकून ठेवला तर तो आरवत नाही असे होत नसते. आणि हा दुरडीतला कोंबडा जेंव्हा आरवतो तेंव्हा पुन्हा एकदा नवीन पहाट झाल्याची सुरूवात असते. नरेंद्र मोदीजी आपण फक्त पुढील लोकसभा निवडणुक जिंकावी एवढीच आमची इच्छा नाही तर भारतात फक्त भारतीय जनता पक्ष हा एकच राजकीय पक्ष शिल्लक राहावा या शुभकामना देण्यासाठी आम्हाला काही लाज वाटणार नाही परंतू आपण चालविला कारभार कुठे तरी मनात खलतो आहे म्हणूनच हा शब्द प्रपंच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *