नांदेड(प्रतिनिधी)-बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड.पारिजात पांडे हे नांदेडला आले असतांना अभिवक्ता संघाने त्यांचा सन्मान केला. बार कॉन्सील ऑफ महराष्ट्र ऍन्ड गोवाचे अध्यक्ष ऍड. पारिजात पांडे हे नांदेडला आले असतांना नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोधमगावकर यांच्या अध्यक्षतेत त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ऍड. पारिजात पांडे यांनी महाराष्ट्र पार कॉन्सील वकीलांच्या कोण-कोणत्या कल्याणकारी योजनांवर काम करत आहे. याची माहिती दिली. या कार्यक्रमात जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोधमगावकर यांच्यासह ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.बी.आर. भोसले, अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ऍड. संजय वाकडे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख, वकील संघाचे सचिव ऍड.रशिद पटेल, ऍड. राजेश नाईक, ऍड. योगेश पाटील, ऍड.चंद्रकांत पत्की, सहाय्यक सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला(डांगे), ऍड. बोईनवाड, ऍड.कुलकर्णी, ऍड. पाटील, ऍड. खान, ऍड.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 1,807 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बारमध्ये दुपारी 24 हजारांची लाच घेणार ग्रामसेवक गजाआड सावधान ! दहावी व बारावी परीक्षेबद्दल अफवा पसरविल्यास कारवाई