नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर आपल्या मित्रासोबत शासकीय दवाखान्याकडे जाणाऱ्या दोघांना धनेगाव ते दुधडेअरी रस्त्यावर तिन जणांनी मारहाण करून लुटले आहे आणि 40 हजार 900 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. वाजेगाव येथील आकाश उत्तम राक्षसमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ते आणि त्यांचे मित्र सुमित संभाजी दुधाडे हे दोघे आपली दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.व्ही.9772 वर बसून वाजेगाव येथून सरकारी दवाखाना विष्णुपूरी येथे जात असतांना 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 22.30 वाजेच्यासुमारास एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी आडवून चाकुचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील 4 हजार रुपये रोख रक्कम एक स्मार्ट वॉच 2500 रुपयांची, दोन मोबाईल 21 हजार रुपयांचे आणि मित्र सुमित दुधाडे यांच्या खिशातील 10 हजार रुपये व 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 40 हजार 900 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 842 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार मांजरमकर अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,624 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कंधारमध्ये 27 जुगारी पकडून 7 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त शंकरनगर येथील एटीएम फोडून 20 लाखाची चोरी