नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईला अंगणवाडीमध्ये जाऊन मारहाण करणाऱ्या कुपूत्राविरुध्द अर्धापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. देळूप(बु) ता.अर्धापूर येथील दुर्गा रामराव लोमटे या 56 वर्षीय महिला अंगणवाडी सेविका आहेत. दि.18 सप्टेंबर रोजी त्या आपल्या अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये काम करत असतांना त्यांचा मुलगा शुभम रामराव लोमटे (25) हा पोहचला आणि त्याने आईला थापडबुक्यांने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दुर्गा लोमटे या शासकीय सेवा करत होत्या म्हणून तो शासकीय कामात अडथळापण झाला. त्या ठिकाणी बालके होती. त्यांच्यासमोर घडलेला हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. अर्धापूर पोलीसांनी दुर्गा लोमटे यांच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 121(1), 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 511/2024 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख आयुब या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 944 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आजची नांदेड स्नेहनगर पोलीस वसाहत.. गणपती विसर्जनात पोलीस निरिक्षकांचा कॉलर पकडणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल