नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी अक्सा कॉलनी अर्धापूर येथे एका घरावर धाड टाकून 71 हजार 8 रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पकडला आहे. अर्धापूरचे अत्यंत निष्ठावंत, कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक चंद्रशेखर आनंदराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजता त्यांनी अक्सा कॉलनी अर्धापूर येथे अब्दुल अजीम अब्दुल अजीज यांच्या घरावर छापा टाकला. तेथे राजनिवास सुगंधीत पान मसाला 189 पॉकिट, गोवा लिहिलेले 55 पॉकिट, मुसाफिर पान मसालाचे 12 पॉकिट, विमल पान मसाला असे लिहिलेले 88 पॉकिट, केशरयुक्त वजिरचे 8 पॉकिट, प्रिमियम झेड एल 01 जाफराणी जर्दाचे 21 पॉकिट, एम-4 असे लिहिलेले 4 पॉकिट, व्ही 01 असे लिहिलेले 1 पॉकिट असे एकूण 87 प्रतिबंधीत तुंबाखू आणि गुटखाचे पॉकिट जप्त केले. या मुद्देमालाची एकूण किंमत 71 हजार 8 रुपये आहे. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 नुसार गुन्हा क्रमांक 508/2024 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक अतुल भोसले अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 939 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What Are the Types of Peer Pressure? Addiction Treatment FL डॉ . रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन