नांदेड(प्रतिनिधी)-विद्यानगर देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 65 हजार 500 रुपयंाचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. स्वप्नील लिंगूराम माडचेलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपासून ते 12 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांचे घर बंद असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे दार तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम 12 हजार रुपये असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 432/2024 नुसार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पत्रे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,401 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विवाहितेला 25 लाखांची मागणी जादुटोणा केला तिघांवर गुन्हा दाखल