नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीस हे रात्री गस्त घालत असतांना त्यांना हिपरगा फाटा येथे तीन संशयीत आढळून आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते घरफोडी गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 89 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल मुक्रमाबाद पोलीसांनी जप्त केला आहे. मुक्रमाबाद पोलीस हे रात्रीच्यावेळी गस्तीवर असतांना त्यांना हिप्परगा फाटा येथे संशयीत युवक आढळून आल्याने त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी आपले नाव अनिल रमेश कांबळे (26) रा.ठाणाकुष्णूर(कर्नाटक) ह.मु.मुखेड, रमेश पोचीराम कडमिचवार(34) रा.मुखेड आणि राहुल शंकर कांबळे(24)रा.ठाणाकुष्णूर(कर्नाटक) ह.मु.मुखेड असे सांगितले. यांना पोलीसांनी विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून न्यायालयात पोलीस कोठडी मागितली. पोलीस कोठडीत त्यांनी नगदी 6 हजार 300 व एक खंजीर, लोखंडी रॉड जप्त केले. यावेळी त्यांनी गुन्हा कबुल करतांना मुक्रामाबाद शाळेतील टी.व्ही. किंमत 33 हजार 630 रुपये, गुन्ह्यातील एक मोटारसायकल किंमत 50 हजार रुपये असा एकूण 89 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल या आरोपींकडून जप्त करण्यात आला. Kanthak Suryatal Post Views: 1,234 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation “एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत 17 सप्टेबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची निवड 19 सप्टेंबर रोजी लॉटरी पद्धतीने होणार