नांदेड(प्रतिनिधी)-बॅंक खात्यात घोळ करून कंपनीचे कॅशिअर, मॅनेजर आणि त्यांच्या एका मित्राने 24 लाख 62 हजार 177 रुपये परस्पर आपल्या खात्यात जमा करून घेतले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. नरेश दलिचंद गोयंका यांच्या एचडीएफसी शाखा गंगापुर जि.नाशिक येथे बॅंक खाते आहे. या कंपनीच्या मॅनेजर, कॅशिअर आणि त्यांचे एक मित्र अशा तिघांनी त्यांची कंपनी श्रीकृष्ण ट्रेडींग कंपनी यावर गोयंकाच्या खात्यातून 20 लाख 86 हजार 366 रुपये वळती करून घेतले. तसेच दुसरे 3 लाख 75 हजार 811 रुपये कंपनीसाठीचे साहित्य खरेदी करण्याच्या नावावर आपल्या खात्यात जमा करून कंपनीसोबत विश्र्वासघात केला आहे आणि एकूण 24 लाख 62 हजार 177 रुपयांचा अपहार केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(3)(4)(5), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 806/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक भोसले करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 936 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र तोडले Онлайн-слоты казино бонус за регистрацию в казино без депозита с минимальным депозитом