नांदेड(प्रतिनिधी)-जबरी चोरी करणाऱ्या चार युवकांना पकडून भाग्यनगर पोलीसांनी त्यांच्याकडून 44 ग्रॅम सोन्याचे तीन गंठण किंमत 3 लाख 21 हजार 527 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दि.4 सप्टेंबर रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख आणि त्यांचे सहकारी गस्त करत असतांना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नांदेड येथील स्पेशल आलू बिर्याणी येथे एक गुन्हेगार थांबलेला आहे. भाग्यगर पोलीसांनी तेथे जाऊन मुकेश गजानन कल्याणकर (24) रा.देविनगर मालेगाव ता.अर्धापूर यास ताब्यात घेतले. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार गणेश दिलीप धबाले, राहुल जाधव व यश चिंतलवाड तिघे रा.शिवनगर नांदेड यांनी वेगवेगळे दोन गुन्हे केल्याची माहिती दिली. त्या प्रकरणात चोरी झालेला 100 टक्के मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम. आदींनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, पोलीस अंमलदार गजानन किडे, प्रदीप गर्दनमारे, ओमप्रकाश कवडे, सुर्यभान हासे, नवनाथ गुट्टे यांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,282 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation How to Become a Deep Learning Engineer in 2024? Description, Skills & Salary राज्यभरात 17 भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या