मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 30 हजार मतदार वाढले
नांदेड, दि. 31 ऑगस्ट : 20 ऑगस्टपर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 30 हजार 218 मतदारांची वाढ झाली आहे. काल 30 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आकडेवारी जिल्हा निवडणूक कार्यालयाने जाहीर केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी मतदार यादी तयार झाली आहे. जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघात एकूण पुरुष मतदारांची संख्या 14 लक्ष 14 हजार 727 आहे तर महिला मतदारांची संख्या 13 लक्ष 36 हजार 740 आहे तृतीयपंथीयांची संख्या 171 आहे.
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघाच्या मतदारांची अंतीम यादी ३० ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द झाली आहे. या नऊ मतदार संघातील मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. 83 –किनवट मतदार संघ एकूण 2 लाख 74 हजार 638 तर 84- हदगाव मतदारसंघात 2 लाख 95 हजार 083, 85–भोकर मध्ये 2 लाख 99 हजार 228 मतदाराची संख्या आहे, 86 -नांदेड उत्तर मतदार संघात 3 लाख 54 हजार 800 तर 87- नांदेड दक्षिण मतदार संघात 3 लाख 13 हजार 653, 88-लोहा 2 लाख 97 हजार 738 तर 89 –नायगाव मतदार संघात 3 लाख 6 हजार 340, 90- देगलूर मतदार संघात 3 लाख 8 हजार 390 व 91-मुखेड मतदारसंघात 3 लाख 01हजार 768 मतदार संख्या आहे. नऊ विधानसभा मतदार संघात एकूण 27 लाख 51 हजार 638 मतदारांची संख्या असून यात 14 लाख 14 हजार 727 पुरुष तर 13 लाख 36 हजार 740 महिलांचा तर 171 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. 6 ऑगस्ट नंतरच्या विशेष नोंदणी अभियानात 30 हजार 218 मतदार संख्या वाढली आहे.