नांदेड -टायनी एंजल्स प्री-प्रायमरी, वामननगर (इंग्रजी) शाळेमध्ये गाकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संध्या देवेंद्र जोशी यांनी चिमुकल्या बालगोपालांचे भरभरून कौतुक केले. एलकेजी व यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेमध्ये येऊन गाण्यावर नृत्य सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाची धुरा प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका पायल तिवारी यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ. प्रणिता कदम, कल्पना भोसले व ज्योती गायकवाड यांनी सहकार्य केले. Kanthak Suryatal Post Views: 992 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून भाग्यनगर पोलीसांनी 12 तासात चोरीचा ऐवज जप्त केला ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन