नांदेड (प्रतिनिधि)-नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली दिली. मंत्री महोदयांसोबत शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.पोलीस दलातर्फे त्यांना हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. Kanthak Suryatal Post Views: 2,652 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वसंतरावांचा सरपंच पद ते संसद सदस्य पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी : गिरीश महाजन बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यमुक्त करण्याचे पोलीस उपमहानिरिक्षकांचे आदेश ; मुदत कालच संपली