नांदेड – विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी उद्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे,तपासणी करणे ,ही प्रक्रिया करता येणार आहे. जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे.उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,916 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र समृध्दी महामार्गामुळे सरकारच्या लोकांची समृध्दी झाली-नाना पटोले