नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एका घरात घुसून चोरट्यांनी महिलांना मारहाण करून घरातील 65 हजारांचा ऐवज बळजबरी चोरून नेला आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यातील पारवा शिवारातून 25 हजार रुपये किंमतीची विद्युत वाहिनी तार चोरट्यांनी चोरून नेली आहे. भाग्यश्री राजू सुवर्णकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास एका व्यक्तीने त्यांच्या घरात बळजबरीने घुसून चाकुच्या सहाय्याने त्यांच्या तळहातावर जखम करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसुत्र ज्याची किंमत 65 हजार रुपये आहे ते चोरून नेले आहे. देगलूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 377/2024 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पत्रे अधिक तपास करीत आहेत. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता विशाल निवृत्ती लाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेदरम्यान हिमायतनगर तालुक्यातील पारवा शिवारातून चोरट्यांनी एक विद्युत खांब तोडून नुकसान केले आणि त्यावर जोडण्यात आलेली विद्युत वाहिणी तार चोरुन नेली आहे. या ऐवजाची किंमत 25 हजार रुपये आहे. तामसा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 89/2024 दाखल केला आहे.पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 834 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लाखो रुपयांच्या चोरीसाठी पोलीसांनी अदखलपात्र कलम जोडून गुन्हा दाखल केला योगेश्र्वरांनी केल्या जाता-जाता 14 पोलीस अंमलदारांच्या बदल्या