नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 1 ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव दिन. यंदाचा जन्मोत्सव सोहळा हा 104 वा जन्मोत्सव सोहळा आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी जनसंपर्क विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.सर्वांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे आदींनी केले. Kanthak Suryatal Post Views: 1,619 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरवी निधी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान येत्या विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणुक आयुक्तांनी जारी केल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीसाठी सुचना