लोहा (प्रतिनिधि)-लोहा तालुक्यात मागच्या चार-पाच दिवसापासून सतत धार पाऊस असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे मागच्या अनेक वर्षापासून धानोरा मक्ता येथे रस्त्याची मागणी करून कोणत्याही लोकप्रतिनिधीने ती पूर्ण केली नाही त्यामुळे येथील लोकांना अंत्यविधीसाठी पाण्यातून रस्ता काढून अंत्यविधी करावा लागत आहे याचेच काल प्रत्यय आला आहे येथील एक वय वृद्ध माणसाचे निधन झाल्यामुळे त्यांना अंत्यविधीसाठी पाण्यातून वाट काढून अंत्यविधी करण्यात आला. लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर ही वस्ती मागच्या अनेक वर्षापासून येथे वसलेली आहे त्यांना जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही हजारो वेळा लेखी निवेदने देऊन लोकप्रतिनिधी प्रशासनास ही बाब लक्षात आणून देण्यात आली परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने या रस्त्यासाठी प्रयत्न केलेले आजपर्यंत दिसून आलेले नाही.. दिनांक 26 जुलै रोजी गांधीनगर येथील वृद्ध व्यक्ती शेख इमाम शेख नबी वय 85 वर्ष यांचे सकाळी निधन झाले त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार करण्यासाठी जाताना संपूर्ण लोकांना अक्षरशा कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढून अंत्यविधी करावा लागला त्यामुळे येथील रहिवाशांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी विषयी संताप व्यक्त केला आहे अनेक वा ागणी करूनही रस्त्याे काम होत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Kanthak Suryatal Post Views: 851 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पिक विमा, आरोग्य, वीज वितरणच्या मुद्यावर पालकमंत्र्यांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी