नांदेड(प्रतिनिधी)-एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दि.17 जुलै 2024 रोजी अमित देशमुख रा.वेदांतनगर राज पार्क याने सायंकाळी 6.50 वाजेच्या सुमारास अत्यंत वाईट उद्देशाने तिच्या गालाला हात लावला आणि वारंवार पाठलाग करत घरी जात असतांना तिला अनेक वेळेस वाईट उद्देशाचे इशारे केले. बालिकेच्या वडीलांनी अमित देशमुखला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देवून त्यांच्याच अंगावर धावून गेला. भाग्यनगर पोलीसांनी अमित देशमुख विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 78 आणि 79 नुसार तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पठाण अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 925 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण राठोड तीन दिवस पोलीस कोठडीत