नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने बातमी प्रकाशीत केली तेंव्हा खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व नांदेड ग्रामीणच्या पोलीसांनी त्वरीत हालचाल करून मरणाऱ्या व्यक्तीचे नाव शेख शहबाज शेख शकील (26) असे शोधले. सोबतच त्याला जिवे मारणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. आषाढी एकादशीची पहाट होत असतांना सकाळी 5.30 वाजता हा खून करण्याचा घटनाक्रम रहिमपुर, मुजामपेठ येथे घडला. या खूनाबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. त्यात महिलांशी असलेली अनैतिक संबंध सुध्दा सहभागी आहेत. सकाळी दिवस उजाडताच मिळालेली अनोळखी मयताचे नाव दुपारी 1 वाजेनंतर स्पष्ट झाले. त्याचे नाव शेख शहबाज शेख शकील(26) असे आहे. त्याला मारणाऱ्या दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. परंतू अद्याप अटक प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 982 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन खंजीर बाळगणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलीसांनी घेतले ताब्यात; 2 लाख 90 हजारांचा ऐवज जप्त