नांदेड(प्रतिनिधी)-मारवाडगल्ली सराफा भागातील मारोती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील ऐवज लंपास केला आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेतील गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. जुन्या नांदेड भागातील सराफा मार्केटच्या पाठीमागील मारवाडगल्लीमध्ये सालासर हनुमान मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत छोट्याशा गल्लीत आहे. आज पहाटे या मंदिराचे पुजारी पुजा करण्यासाठी आले असतांना मंदिराचे दार तोडलेले होते. सोबतच दानपेटी सुध्दा फोडलेली होती. त्यातील काही नाणी खाली पडलेली होती.या दानपेटीतील एकूण ऐवज किती होता याची माहिती प्राप्त झाली नाही. परंतू मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली आहे हे नक्की.वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाने गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. Kanthak Suryatal Post Views: 1,020 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जनतेतील कोणाला तरी खड्ड्यांची लाज वाटली आणि लावला बोर्ड 40 तोळे सोने आणि 22 लाख रुपये रोख रक्कमेचा दरोडा टाकणारे सहा जण नऊ दिवसात जेरबंद