नांदेड(प्रतिनिधी)-28 मे स्वातंत्रविर विनायक दामोधर सावरकर यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्यविर सावरकरांना अभिवादन करण्यात आले. 28 मे हा भारतीय स्वातंत्र्यात महत्वाची भुमिका निभावणारे स्वतंत्रता सेनानी विनायक दामोधर सावरकर यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांनी स्वातंत्र्यविर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी कार्यालयातील सर्व विभागांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जनसंपर्क विभागाचे पोलीस अंमलदार मारोती कांबळे आणि विनोद भंडारे यांनी केले. Kanthak Suryatal Post Views: 906 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्रकार धनंजय सोळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची अद्ययावत तयारी