नांदेड (प्रतिनिधी) – शबरीमला यात्रेच्या पार्श्वभूमीवर केरळमधील भगवान अय्यप्पा स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे ने  यात्रेकरूंच्या सोयीसाठी ट्रेन ओन डिमांड या संकल्पनेअंतर्गत हजूर साहिब नांदेड-कोल्लम-हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 07687 हजूर साहिब नांदेड – कोल्लम : शबरीमला विशेष रेल्वे हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 07 डिसेंबर 2026 ते 11 जानेवारी 2027 या कालावधीत दर सोमवारी धावणार असून नांदेड येथून दुपारी 13:00 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी 06:00 वाजता कोल्लम येथे पोहोचेल. ह्या रेल्वे गाडीच्या एकूण 6 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 07688 कोल्लम – हजूर साहिब नांदेड :  शबरीमला विशेष रेल्वे कोल्लम येथून 09 डिसेंबर 2026 ते 13 जानेवारी 2027 या कालावधीत दर बुधवारी धावणार असून कोल्लम येथून सकाळी 09:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 23:00 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. या रेल्वे गाडीच्याही एकूण 6 फेऱ्या होणार आहेत.

महत्त्वाच्या स्थानकांवरील थांबे :

या विशेष रेल्वेगाड्यांना मुदखेड, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, रायचूर, मंत्रालयम रोड, गुत्ती, अनंतपूर, धर्मावरम, चित्तूर, काटपाडी, तिरुवन्नामलाई, विल्लुपुरम, तिरुचिरापल्ली, मदुराई, तेनकासी, पुन्नलूर आणि कोट्टारक्करा यांसह मार्गावरील विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

गाडीची संरचना

या विशेष रेल्वेगाड्या एकूण 22 LHB डब्यांसह चालविण्यात येणार आहेत. यामध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य शयनयान श्रेणीतील डब्यांचा समावेश आहे. या विशेष रेल्वेगाड्यांच्या संचालनामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू मार्गे केरळमधील शबरीमला यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!