नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून गुन्हा केलेल्या आरोपीला लिंबगाव पोलीसांनी अंधारात त्याचा पाठलाग करून दोन तासात गाजआड केले आहे. दि.20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून एक 25 वर्षीय व्यक्ती अंधाराचा फायदा घेवून फरार होत असतांना लिंबगाव पोलीसांनी त्याचा अंधारात पाठलाग करून त्याला गजाआड केले आहे. या संदर्भाने लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 63/2024 दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलमासह पोक्सो कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन आदींनी लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एम.दळवे, पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर, पोलीस अंमलदार एस.बी.सुर्यवंशी, काझी, पेद्देवाड यांनी पळून जाणाऱ्या शंकर गौतम गच्चे (25) यास पकडल्याबद्दल कौतुक कले आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत झाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,260 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख लिपीकाला आता कंत्राटदार वाचविणार काय? ; माहिती आयुक्तांच्या आदेशाचा केराची टोपली नांदेड जिल्हयात गुन्हेगाराच्या टोळ्या करुन गुन्हे करणारे 70 इसम नांदेड जिल्हयातुन हद्दपार, 14 स्थानबध्द