नांदेड(प्रतिनिधी)-कालच वास्तव न्युज लाईव्हने पोलीस अंमलदाराने खरेदी केलेल्या हायवा बाबत आणि काही इतर बाबींबद्दल एक वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर याच पोलीस अंमलदाराने अनेक पोलीसांकडून पोलीस महासंचालकांचे कर्ज मंजुर करून घेण्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेतल्याची नवीन माहिती हाती आली आहे. असे करणे पोलीस अंमलदाराच्या पदाला नक्कीच शोभणारे नाही. काल कंधार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार एकनाथ घुले यांनी हायवा घेतली आणि त्याची पुजा केली. या संदर्भाने आम्ही एक वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामध्ये त्यांची नेमणुक कंधार पोलीस ठाण्यात आहे. परंतू ते काम पोलीस उपअधिक्षक कंधार यांच्या कार्यालयातील विशेष पथकात करतात. याचा उल्लेख केला होता. एकनाथ घुले यांचे गाव संगमवाडी ता.कंधार असे आहे. त्यासोबतच कंधारेवाडी या गावात त्यांची जमीन असल्याचा उल्लेख सुध्दा वास्तव न्युज लाईव्हने केला होता. ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर नव्यानेच नवीन माहिती समोर आली. त्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकनाथ घुले यांनी अनेक पोलीसांकडून प्रत्येकी 2 लाख रुपये घेतले आणि त्यांचे पोलीस महासंचालकडून मिळणारे कर्ज मंजुर करून आणतो असे आश्र्वासन दिले. पोलीस महासंचालकांच्यावतीने पोलीसांना स्वत:चे घर बांधण्यासाठी 50-60 लाखांपर्यंत कर्ज मिळत असते. पण ज्या पोलीसांकडून एकनाथ घुले यांनी पैसे घेतले त्या सर्वांचेच कर्ज मंजुर झाले नाही. तेव्हा ज्यांचे कर्ज मंजुर झाले नाही. त्यांनी आपण दिलेले 2 लाख रुपये परत मागितले. त्यावेळी एकनाथ घुले यांनी कंधारेवाडी येथे असेलेल्या आपल्या-शेतजमीनीचा एक-एक घुंगठा ज्यांचे पैसे द्यायचे होते त्यांना रजिस्ट्री करून दिल्या. सोबतच गाव नमुना क्रमांक 8 मध्ये सुध्दा नवीन मालकाची नोंद झाली. पुन्हा जेंव्हा एकनाथ घुले यांच्याकडे पेैसे आले तेंव्हा त्यांनी ते 2-2 लाख रुपये परत करून पुन्हा त्या जागेची रजिस्ट्री आपल्या नावावर करून घेतली. हा अभिलेख ग्राम पंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. तो काही मिटवता येण्यासारखा अभिलेख नाही. पण पोलीस असतांना हा नवीन व्यवसाय एकनाथ घुले यांनी केल. याचे आश्चर्यवाटते. Kanthak Suryatal Post Views: 118 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या संपाचा दुसरा दिवस