नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्यावतीने सुरू करण्यात आलेला बेमुदत संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होता.पण आता दुसऱ्या दिवशी जे दृश्य दिसले त्यात या संपाचे काय होईल याचा काही थांगपत्ता आज लागला नाही. असेच चालत राहिले तर शेवटी त्रास पक्षकारांनाच होणार.
आज दुसऱ्या न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्यभर संप सुरूच होता. महाराष्ट्रात 34 हजार न्यायालयीन कर्मचारी आहेत. त्यांची मागणी फक्त ऐवढीच आहे की, ज्या वेतन श्रेणीप्रमाणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी आहे. तशीच आम्हाला मिळावी. ज्या पध्दतीचे काम ते करतात जवळपास त्याच पध्दतीचे सर्व काम आम्ही सुध्दा करतो. प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल झालेल्या संपामुळे 1 लाख 86 हजार 167 प्रकरणांमध्ये पुढची तारखीच देण्यात आलेली नाही. काही जण सांगतात की, काही न्यायाधीशांनी स्वत: पक्षकांराना आणि वकीलांना पुढील तारीखा दिल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशी सुध्दा असाच काहीसा प्रकार घडला असेल.
तज्ञ सांगतात या दोन दिवसांमध्ये न्यायालयामध्ये रिमांड आला असेल त्याची काय अवस्था झाली असेल. ती सर्व कामे काल आणि आज न्यायाधीशांनी केली. पण कितीदिवस करू शकतली. सोबतच दररोजच्या प्रकरणाची दैनंदिनी लिहावी लागते. ती दैनंदिनी कोण लिहिल. काही न्यायाधीशांनी दैनंदिनी पण लिहिल्या आहेत. पण एक सर्वसाधारण काम आता अडचणीकडे जात आहे. हे मात्र नक्कीच .
काही तज्ञ सांगतात न्यायालयीन कर्मचाऱ्यांना शासनाचे कर्मचारी समजले जात नाहीत. ते उच्च न्यायालयाचे मातहत आहेत. असे मानले जाते. म्हणून शासन या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाला तुम्हीच करा असे बोलत आहे. उच्च न्यायालयाच्या समोर त्यामुुळे सुध्दा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कर्मचारी महासंघ या प्रकरणात कधीच मागे हटणार नाही असे कर्मचारी संघटनेचे सदस्य बबन गजभारे आणि सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश मगरे यांनी सांगितले.आज संपाच्या दुसऱ्या दिवशी ऍड. दिलीप मनाठकर यांनी संपात सहभागी कर्मचाऱ्यांसाठी चहा-बिस्कीट मागविले होते. ऍड. नितीन सोनकांबळे यांनी खिचडी वाटप केली. संपाच्यावेळी अजूनही मदत मिळेल कधी वकील संघ सुध्दा संप करतील पण संपामुळेच सर्व काही शक्य होईल काय? असा प्रश्न जेंव्हा विचारला जातो तेंव्हा सांगितले जाते की आई- आपल्या लेकराला सुध्दा तो रडल्याशिवाय दुध पाजत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!