नांदेड(प्रतिनिधी) – दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर त्रस्त झाले असताना दिवाळी सणात सौ.स्मिता धनराज पाटील यांनी आनंदाचा शिधा वाटून सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड केली आहे. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमाल किशोर कदम यांनी केले. नांदेड तालुक्यातील निळा येथे सौ. स्मिता धनराज पाटील यांच्यावतीने दि.9 नोव्हेंबर रोजी दिवाळी सणा निमित्त आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमी गरजू 5000 नागरिकांसाठी आनंदाचा शिधा उपक्रम राबविण्यात आला अनेकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी कदम बोलत होते. या आयोजित कार्यक्रमास राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, बाबुराव जोगदंड, सौ. जयश्री आलेगावकर, सौ.स्मिता पाटील, धनराज पाटील, सौ निलाबाई जोगदंड, गोविंदराव जोगदंड, कोंडीबा जोगदंड, शिवाजी गुरूजी, माजी सभापती लक्ष्मण इंगोले, ग्यानोबाराव कदम, तातेराव पाटील आलेगावकर, उत्तमराव पाटील आलेगावकर, किरण जोगदंड यांच्यासह आदी जणांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना कमलकिशोर कदम म्हणाले की, मराठवाड्यामध्ये पावसाचे अत्यल्प प्रमाण पाहता दुष्काळ जाहीर केलेला आहे. या दुष्काळामुळे शेतमजुर, शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. दिवाळी सण कसा साजरा करावा हा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला होता. परंतू भगवानराव पाटील आलेगावकर यांच्या कन्या सौ.स्मिता धनराज पाटील यांनी दुष्काळामध्ये आनंदाचा शिधा हा उपक्रम राबवून गरीब, कष्टकरी नागरिकांची दिवाळी गोड केली आहे. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे कदम यांनी सांगितले. तर माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांनी सांगितले की, दुष्काळामुळे ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीत सौ.स्मिता पाटील यांनी आपल्या भागातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आनंदाचा शिधा उपक्रम राबविला. या उपक्रमातून त्यांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी आधार मिळाला आहे असेही त्यांनी सांगितले. तर आ.बालाजीराव कल्याणकर यांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे. तर कार्यक्रमाचे आयोजक सौ.स्मिता धनराज पाटील यांनी सांगितले की, दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आणि सामाजिक भान लक्षात घेता आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला आहे. 5 हजार किट उपलब्ध करून दिल्या आहेत आदी स्वरूपाचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी माझ्या मुलीनी हा आनंदाचा शिधा उपक्रम राबविला या उपक्रमातून निश्चितच सर्वसामान्य व्यक्तीची दिवाळी गोड झाली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. आनंदाचा शिधा मध्ये तुपाचा डबा सौ.स्मिता धनराज पाटील यांनी गरजू नागरिकांसाठी आनंदाचा शिदा उपक्रम राबवून या शिधा मध्ये गव्हाचे पीठ, तूर डाळ, चना डाळ, तांदूळ, साखर, शेवया या वस्तू सोबत एक तुपाचा डबा देखील दिला आहे त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 178 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पवननगरात घरफोडी; ९ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास आदिवासी बांधवांना गावातच शासकीय योजनांचा लाभ मिळणार;११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह