नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर ते भोकर रस्त्यावर अज्ञातांनी प्रल्हाद मिरासे व त्यांचे साथीदार हिमायतनगरकडून भोकरकडे जात असतांना अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मित्राजवळ असणारे दोन मोबाईल फोन किंमत 22 हजार रुपये व रोख 13 हजार रुपये असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना दि.17 मे रात्री 8 ते 9 दरम्यान घडली असून याबाबत प्रल्हाद मिरासे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 35/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 341, 34 भादवीप्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कदम हे करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत भाग्यनगर हद्दीतील 17 मे रोजीच्या रात्री 12.30 ते 1 वाजेच्यादरम्यान बी.के.हॉल इन्फीनिटी स्टडी पॉईंट येथील सुहास बालाजी सरपाते (18) या विद्यार्थ्याच्या काळ्या रंगाच्या बॅगमधील ऍपल कंपनीचा आय पॅड, तीन चार्ज, एअर बर्ड तसेच पुस्तके असा एकूण 22 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या असल्याची तक्रार भाग्यनगर पोलीस ठाण्यात िली आहे. यावरून गुन्हा क्रमांक 205/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार वसमतकर हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 714 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अंदाजे 19 लाख रुपये भरलेले एटीएम मशीन चोरट्याने चोरले श्री गवळी समाजसेवक संघटना तर्फे नि:शुल्क प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिबीर संपन्न