मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा; प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन नांदेड (प्रतिनिधी) -महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघ, नांदेड यांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी दि.6 नोव्हेंबर 2026 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयोजित करण्यात येणारे बेमुदत धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. अंशकालीन स्त्री परिचरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. यावेळी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून त्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.अंशकालीन स्त्री परिचरांचे थकीत वेतन व ऑर्डर तात्काळ अदा करणे, विविध आरोग्य उपकेंद्रांतील मागील आठ महिन्यांचे थकीत वेतन देणे, दिवाळी बोनस अदा करणे, सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे, अंशकालीन पद्धत रद्द करून कायम सेवेत सामावून घेणे, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), पेन्शन व ईएसआय योजना लागू करणे, प्रसूती रजा, आजारपणाची रजा व साप्ताहिक सुट्टी लागू करणे, गणवेश भत्ता देणे तसेच रिक्त पदांवर प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेणे आदी मागण्यांचा समावेश आहे.संघटनेने वारंवार निवेदने देऊनही मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे ६ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत तातडीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.यावेळी कॉ. प्रदीप नागपूरकर, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. अब्दुल गफ्फार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 116 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बंदा घाटाच्या रम्य काठावर फुलणार दिवाळी पहाट २०२६ फुकट्यांकडून रेल्वेने दोन दिवसात वसूल केले १२ लाख ७५ हजार ९४० रुपये