अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर ते वसमत मार्गावरील मेंढला पाटीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.नंदकिशोर लक्ष्मण अंजनवाड (वय ४८, रा. पिंपळकवठा, ता. मुदखेड, जि. नांदेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर अंजनवाड हे एमएच २६ डीबी ५९४० क्रमांकाच्या दुचाकीवरून वसमत येथून नांदेडकडे जात होते. दरम्यान, अर्धापूर-वसमत मार्गावरील मेंढला पाटीच्या पुढे एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर महामार्ग पोलिस उपनिरीक्षक जरार पोलीस अंमलदार पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. अपघातातील दुसरे वाहन अज्ञात असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 446 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धनेगावात तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १४ जुगारी जेरबंद;९ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त गवंडगाव शिवारात अवैध तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा दाखल