नांदेड – शहरातील दीपकनगर येथील सारनाथ बौद्ध विहारात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन आणि वर्षावास समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. एच. व्ही. मोरे आणि श्यामराव लोणे यांनी ग्रंथवाचन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील विचारांचे वाचन करण्यात आले. भगवान बुद्धांचे विचार, समता, बंधुता, करुणा आणि सामाजिक प्रबोधनाचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले. वर्षावास समारोपाच्या निमित्ताने धम्मविचारांचे आचरण आणि समाजात बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. यावेळी अलका देवके, सूर्यकांता लोणे, सुमनबाई भवरे, मीरा सूर्यवंशी, ललिता वाठोरे, चंद्रकला इनायते, कमलबाई आळणे, छाया गोदणे, सुजाता कदम, वच्छला नरवाडे, आशा कांबळे, अम्रपाली गोवंत, कुसुम खंदारे, मीरा नरवाडे, रमा कांबळे, वंदना नरवाडे, शांताबाई कांबळे, ज्योती देवके, चंद्रकला गायकवाड आणि दैवशाला आळणे यांच्यासह महिला उपस्थित होत्या Kanthak Suryatal Post Views: 318 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि हल्ला महल्ला उत्साहात साजरा