नांदेड(प्रतिनिधी)-अक्षय तृतीयेची पहाट होण्याअगोदरपासून तीन भंडारी बंधूच्या विविध आस्थापना आणि घरे आयकर विभागाने तपासली त्यातत जवळपास 200 कोटी रुपयांपेक्षा जास्तचे घबाड सापडले आहे. त्यात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे, सोन्याची बिस्कीटे आणि विविध संपत्तीचा समावेश आहे.
अक्षय तृतीयेचा सुर्योदय होण्याअगोदरच नाशिक येथील आयकर विभागातील जवळपास 80 अधिकारी आणि कर्मचारी, परभणीचे पोलीस असे पथक विविध गाड्यांमध्ये नांदेडला पोहचले आणि भंडारी कुटूंबियांच्या घरात प्रवेश घेतला. त्यानंतर तपासणी सुरू झाली. ही तपासणी चार दिवस चालली. आज सकाळी आयकर विभागाचे पथक परत गेले आहे.
भंडारी कुटूंबियांच्या विविध 7 आस्थापना आहेत. त्यामध्ये सापडलेल्या कागदपत्रे, हार्डडिस्क, पेन ड्रायईव्ह यानुसार भंडारी कुटूंबियांकडे 170 कोटी रुपये किंमतीची संपत्ती आहे. तपासणीत त्यांच्या घरात 14 कोटी रुपये रोख, 8 किलो सोन्याचे दागिणे आणि सोन्याची बिस्कीटे असा 5 कोटी 60 लाख रुपयांचा ऐवज सापडला आहे. सोबतच काही हिरे सुध्दा सापडले आहेत. त्यांच्या किंमतीचे मुल्य कळले नाही. नांदेडच्या एसबीआय शाखेतून नोटा मोजण्यासाठी 14 कर्मचारी बोलावण्यात आले होते.
आयकर विभागातील तज्ञाने सांगितल्याप्रमाणे आता या सर्व बाबीची पुन्हा सखोल तपासणी होईल आणि त्यानुसार भंडारी कुटूंबियांकडील संपत्तीचा आलेख तयार होईल. त्यानंतर त्यांनी चुकवलेला कर आणि करावरील दंड अशी प्रक्रिया पार पडते. घरातील काही गाद्यांमध्ये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे लपवलेले सापडले आहेत.