नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 1 लाख 65 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मार्केट परिसर, पिपळगाव (माहूर) व नागनखेडा येथे ही धडक कारवाई करण्यात आली. या दरम्यान अवैधरित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, इंजिन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान सुमारे 37 हजार रुपये किमतीची वाळू, 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे इंजिन, तसेच 50 हजार ते 75 हजार रुपयांच्या दरम्यानची वाहने अशा एकूण 1 लाख,65 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संबंधित वाहनांवर गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.या गुन्ह्या मध्ये तेतर श्रवण चौधरी,राधेश्याम कैलास चौधरी,रंजित राजेश्वर यादव,शिवसदन सुकट बीत, सर्व रा. बिहार,सचिन मोरे (मालक),आदिनाथ मोरे (मालक),प्रताप मोरे (मालक),रा. भनगी,नामदेव व्यंकटी मोरे (हायवा चालक) रा. वडेपुरी ता. लोहा अश्या ८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे,पोलीस अंमलदार पंचलिंग,गवेंद्र सिरमलवार,शंकर माळगे, हनवता कदम,समीर,चावरे यांनी केली. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 585 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रामतीर्थ पोलिसांची जलद कारवाई; विनयभंग प्रकरणात 12 तासांत दोषारोपपत्र दाखल ईदचा चंद्र की युद्धाचा ज्वालामुखी? इराणला विजयाकडे नेणार काय ईद ?