नांदेड (प्रतिनिधी) – रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या 12 तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. या प्रकरणी गुन्हा क्र. 47/2025, कलम 74 भारतीय न्याय संहिता-2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. याबाबतची फिर्याद 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.54 वाजता नोंदवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलीस निरीक्षक विक्रम हारेळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भवानगीकर, कुलकर्णी आणि नागिन माने यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाताळली. प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल परमेश्वर गुंड (वय 27, रा. बिवरिंग, ता. किनवट, जि. नांदेड) याला अटक करून त्याच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात आले. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले. महिला व बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कडक भूमिका घेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण केला. अवघ्या 12 तासांत दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे ही कारवाई विशेष ठरली आहे. Kanthak Suryatal Post Views: 623 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घरफोडीत एक लाखांचे दागिने लंपास नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध्य वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही