नांदेड :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्च 2025 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यानी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री 7 मार्च 2025 पर्यत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. तसेच अयोध्या धामला जाण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जावून , मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक, जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्राना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत झाली आहे. या योजनेत नांदेड येथील अध्योध्या धाम तीर्थ क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. तर तसेच संबंधिताना मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत आहे, तरी सर्व पात्र जेष्ठ लाभार्थी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,032 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी 10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना पोलीस कोठडी